भेगा पडलेल्या टाचांसाठी घरगुती उपाय

By Hiral Shriram Gawande
Jun 08, 2024

Hindustan Times
Marathi

उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे पाय फाटणे स्वाभाविक आहे. 

Pexels

मोजे तुमचे पाय मऊ ठेवण्यास मदत करतात. पण उन्हाळ्याच्या ऊन आणि घामामुळे मोजे घालता येत नाही. 

Pexels

केळीचा मास्क हा कोरडे पाय, भेगा पडलेल्या टाचांवर उत्तम उपाय आहे. 

Pexels

एक पिकलेले केळी चांगली मॅश करा. त्यात एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण भेगा पडलेल्या भागावर आणि आजूबाजूला लावा. 

Pexels

हा मास्क पायांना लावून त्यावर पॉलिथिनने बांधा. अर्धा तास राहू द्या, पॉलिथिन काढून टाका आणि पाय चांगले धुवा.

Pexels

हा मास्क आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा ज्यामुळे टाचांच्या भेगापासून सुटका मिळेल.

Pexels

रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला सकाळी मऊ त्वचा देईल.

Pexels

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!