कॅन्सरचा ड्रामा करतेय म्हणणाऱ्यांना हिनाने दाखवल्या जखमा!

By Harshada Bhirvandekar
Jul 07, 2024

Hindustan Times
Marathi

टीव्ही अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. 

हिना खान स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

हिनाने अलीकडेच खुलासा केला होता की, तिला ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि ती या आजारच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे.

ही बातमी तिने आपल्या एका सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना दिली होती. 

या बातमीने हिनाच्या चाहत्यांसह, तिच्या सहकालाकारांना देखील हादरवून सोडले. 

दरम्यान बिग बॉसच्या एका स्पर्धकाने हिनाच्या कॅन्सरची बातमी खोटी असल्याचे म्हटले. 

लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी हिना हा ड्रामा करतेय, असे पुनीत सुपरस्टारने म्हटले होते.

हिनाने आता सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना केमोथेरपीमुळे शरीरावर झालेल्या जखमा दाखवल्या आहेत.

नुकतेच हिना खानने काही फोटो शेअर केले असून, यात शरीरावरील जखमा दाखवल्या आहेत.

तामिळ अभिनेत्रीच्या पारंपरिक साडीत ग्लॅमरस अदा!