ही आहे सकाळी उठण्याची योग्य वेळ!
By Hiral Shriram Gawande
Sep 12, 2024
Hindustan Times
Marathi
रात्री वेळेवर झोपावे आणि सकाळी लवकर उठण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. विज्ञान सुद्धा हेच सांगते.
रोज सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.
आजच्या व्यस्त जीवनात लोकांना नीट झोप घेणे कठीण झाले आहे. पण सकाळी लवकर उठण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
आरोग्य तज्ञांच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसातून ७ ते ८ तास झोपले पाहिजे. हे तुम्हाला खूप निरोगी बनवेल.
त्यापेक्षा कमी झोप घेतल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात यात शंका नाही.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री १० ते ११ वाजता दरम्यान झोपावे. सकाळी ६ ते ७ या वेळेत उठल्याने शरीराला चांगले आरोग्य लाभते.
सकाळी लवकर उठल्याने सर्व कामे वेळेवर होतात. व्यायाम, चालणे, वाचन, नाश्ता इत्यादी तुम्ही वेळेवर पूर्ण कराल.
तसेच हे सर्व वेळ सकारात्मक राहण्यास मदत करते. त्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.
‘अशा’ लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर!
पुढील स्टोरी क्लिक करा