ही आहेत हेल्दी रिलेशनशिपमध्ये असण्याची चिन्हं!

By Hiral Shriram Gawande
Aug 17, 2024

Hindustan Times
Marathi

नात्यात एकमेकांना शारीरिक आणि भावनिक आधार देणे हे निरोगी रिलेशनशिपचे लक्षण आहे.

आपल्या जोडीदाराला अशा काही गोष्टी आवडू शकतात ज्या आपल्याला आवडत नाहीत. त्याचा आदर करणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपण निरोगी नात्यात आहात.

नात्यात एक व्यक्ती बोलणारी दुसरी व्यक्ती चांगली श्रोता असू शकते आणि सल्ला देऊ शकते. त्या सल्ल्यानुसार काही बदल झाले तर तुम्ही हेल्दी रिलेशनशिपमध्ये आहात.

नात्यात तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही पहिले केले पाहिजे तर ते दुसऱ्या बाजूनेही मिळेल. असे होत असेल तर तुमचे नाते निरोगी आहे. 

दोघांमध्ये भांडण होईल. जर काही मिनिटात ते विसरून तुम्ही बोलण्यास सुरुवात केली आणि जर दुसऱ्या जोडीदाराने प्रतिसाद दिला आणि ते सोयीस्कर झाले, तर तुम्ही निरोगी नात्यात आहात.

जोडीदाराने तुमच्याशी भांडण, तुमचा वैयक्तिक राग, त्यांच्या कुटुंबातील मतभेद या गोष्टी इतरांसोबत शेअर केल्या नाहीत तर हे निरोगी नात्याचे लक्षण आहे.

दोघांनाही शारीरिक जवळीकतेची जाणीव असल्यास आणि एकमेकांसाठी वेळ काढण्याचा आनंद घेतल्यास निरोगी नात्याची चिन्हे आहेत.

जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांचे कौतुक करता, आभार मानता आणि माफी मागता तेव्हा ते निरोगी नाते असते.

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik