सायकल चालवण्याचे आश्चर्यकारक फायदे

By Hiral Shriram Gawande
Jun 03, 2023

Hindustan Times
Marathi

फिट राहण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्यायाम आणि रूटीन फॉलो करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की सायकलिंग हा फिट राहण्याचा सोपा मार्ग आहे?

Pexels

दररोज अर्धा तास सायकल चालवल्याने तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधरते. जागतिक सायकल दिनानिमित्त जाणून घ्या सायकलिंगचे फायदे. 

unsplash

संशोधनानुसार जे लोक आठवड्यातून ५ दिवस अर्धा तास सायकल चालवतात ते व्यायाम न करणाऱ्यांपेक्षा कमी वेळा आजारी पडतात.

unsplash

रिपोर्ट्सनुसार शारीरिकरित्या सक्रिय असण्याने तुमचे रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते, जे तुमची सेक्स ड्राइव्ह वाढवण्यास मदत करते.

Pexels

दररोज सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका ५० टक्क्यांपर्यंत कमी होतो.

unsplash

सायकल चालवणे तुम्हाला आनंदी बनवू शकते. तज्ञ म्हणतात की कोणत्याही प्रकारचा व्यायाम नैसर्गिकरित्या फील-गुड एंडॉर्फिन सोडतो जे तणावाचा सामना करण्यास आणि तुम्हाला आनंदी ठेवण्यास मदत करतात. 

unsplash

सायकल चालवल्याने फिटनेससोबतच झोपेला सुद्धा मदत होते. सायकलिंग किंवा कोणताही व्यायाम केल्याने शांत झोप लागते. 

Pexels

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या. 

Pexels