कितीवी शिकलीय ‘हीरामंडी’ची ‘आलमजेब’?

By Harshada Bhirvandekar
May 28, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री शर्मिन सेगल हिने ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये ‘आलमजेब’ हे पात्र साकारले आहे. यामुळे ती सध्या चर्चेत आहे.  

काही लोक शर्मिनला सपोर्ट करत आहेत, तर काहीजण तिच्या खराब अभिनयामुळे तिला ट्रोल करत आहेत.  

सध्या शर्मिन तिच्या खऱ्या आयुष्यात देखील प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्याबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.  

शर्मिनच्या शिक्षणापासून ते तिच्या संसारापर्यंत अनेक गोष्टी सध्या सर्च केल्या जात आहेत. संजय लीला भन्साळी यांची भाची असणारी शर्मिन कितीवी शिकली आहे, चला आज जाणून घेऊया...

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने न्यूयॉर्कमधील ली स्ट्रेटबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले.  

अभिनयाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शर्मिन भारतात परतली आणि तिने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली.  

असिस्टंट डायरेक्टर म्हणून शर्मिनने ‘मेरी कॉम’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘रामलीला’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 

शर्मिनने २०१९मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘मलाल’ या चित्रपटातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. २०२३मध्ये अमन मेहतासोबत लग्न केलं असून, तिचे पती व्यवसायिक आणि टोरेंट ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत.

बिकिनी-मोनोकिनीपासून ते गाऊनपर्यंत सनी लिओनीची हॉट अंदाज पहिला का ?