‘हे’ फायदे ऐकून तुम्हीही अंडी खायला कराल सुरुवात!

By Harshada Bhirvandekar
Nov 25, 2024

Hindustan Times
Marathi

संशोधन असे म्हणते की, महिलांनी दिवसातून एक  अंडे खावे. अंडी खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुधारते.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, अंड्यातील कोलीन कंपाऊंड मेंदूचे कार्य, स्मरणशक्ती आणि मेंदूच्या पेशींमधील संवाद सुधारते.

तसेच, अंड्यांमध्ये जीवनसत्त्वे B6, B12 आणि फॉलिक ऍसिड असतात, जे मेंदूचे संकोचन आणि संज्ञानात्मक घट कमी करण्यास मदत करतात.

कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो येथील संशोधकांनी ५५ वर्षांवरील ३५७ पुरुष आणि ५३३ महिलांचा अभ्यास केला. यात असे आढळून आले की, ज्या स्त्रिया दररोज अंडी खातात त्यांची स्मरणशक्ती चांगली होती.

मध्यम आकाराच्या अंड्यामध्ये १३ आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि उच्च-गुणवत्तेची प्रथिने असतात. अंड्यांमधील नव्वद टक्क्यांहून अधिक प्रथिने शरीराद्वारे सहजपणे शोषली जातात.

यामुळे, प्रथिने जैवउपलब्धतेमध्ये अंड्यांचा क्रमांक खूप वरचा आहे. मुलांच्या वाढीसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक असतात.

प्रौढांमध्ये लीन टिश्यू आणि रोगप्रतिकारक शक्ती राखण्यात प्रथिने देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. गर्भवती स्त्रिया अंड्याचे सेवन करून न जन्मलेल्या मुलाच्या मेंदूच्या विकासास मदत करू शकतात.

अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये काही उच्च-गुणवत्तेची प्रथिने, रिबोफ्लेविन आणि सेलेनियम असले, तरी अंड्यातील बहुतेक पौष्टिक मूल्य अंड्यातील पिवळ बलकामध्ये आढळते.

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याला  कसं दूर ठेवाल?

freepik