हेल्दी आणि टेस्टी चटपटीत मशरूम सूप रेसिपी

By Harshada Bhirvandekar
Jan 14, 2025

Hindustan Times
Marathi

मशरूम सूप चवीला खूपच टेस्टी असते आणि शरीरासाठीही अतिशय आरोग्यदायी असते. हे सूप बनवणे देखील सोपे आहे.

मशरूम सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य : कांदा, लसूण, दूध, बटर, मीठ आणि काळी मिरी 

कृती : मशरूम चांगले धुऊन आणि चिरून घ्या. सोबतच कांदा आणि लसूण देखील बारीक चिरून घ्या.

आता एका कढईमध्ये बटर गरम करून त्यावर कांदा, लसूण आणि मशरूम सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

जेव्हा कांदा आणि मशरूम शिजून मऊसर होऊ लागतील, तेव्हा त्यात हळूहळू थोडे दूध घाला आणि हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.

यामध्ये चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पूड घालून गॅस बंद करा. नंतर थोडे पाणी घालून ब्लेंडरच्या मदतीने याचं बारीक वाटण करून घ्या.

या मिश्रणाचं एक घट्टसर सुप तयार झालं की, ते ६-८ मिनिट मंद आचेवर शिजवून घ्या. यामुळे चव सुधारेल आणि सूप थोडेसे घट्ट देखील होईल.

आता वरून कोथिंबीर,  क्रीम आणि मशरूमचे काही भाजलेले काप घालून हे सूप गरमागरम सर्व्ह करा.

लाडू खा आणि वजन कमी करा!

Pixabay