धूम्रपान करणे खूप धोकादायक आहे. यामुळे कॅन्सर आणि हृदयविकार होऊ शकतात. मात्र, सिगारेट ओढणे सोडल्यानंतर शरीरात काही महत्त्वाचे बदल दिसून येतात.

धूम्रपान सोडल्यानंतर शरीरात काय बदल होतात?

pexels

By Ashwjeet Jagtap
Feb 10, 2025

Hindustan Times
Marathi

धूम्रपान सोडल्यानंतर ८ तासांनंतर शरीरातील बीपी कमी होतो. निकोटीन आणि कार्बन मोनोऑक्साइड निम्म्यापर्यंत कमी होतेधूम्रपान सोडल्यानंतर २४ तासांनी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. हृदयाला ऑक्सिजनसाठी जास्त रक्त पंप करण्याची आवश्यकता नसते.

pexels

धूम्रपान सोडल्यानंतर २४ तासांनी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. हृदयाला ऑक्सिजनसाठी जास्त रक्त पंप करण्याची आवश्यकता नसते.

pexels

धूम्रपान सोडल्यानंतर ४८ तासांनी फुफ्फुसातील निकोटिन आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. निकोटीन पूर्णपणे काढून टाकले जाते. पण थोडी डोकेदुखी आणि थकवा जाणवतो.

pexels

धूम्रपान सोडल्यानंतर दोन आठवडे ते ३ महिन्यांच्या दरम्यान, फुफ्फुसे मजबूत होतात. या दरम्यान फुफ्फुसे नॉर्मल होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.

pexels

धूम्रपान सोडल्यानंतर एक वर्षानंतर हृदयरोग होण्याची शक्यता निम्म्याने कमी होते.

pexels

धूम्रपान सोडल्यानंतर पाच वर्षांनी तोंडी, अन्ननलिका, मूत्राशय आणि घशाचा कर्करोग होण्याची शक्यता निम्म्याने कमी होते. स्ट्रोक आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग होण्याची शक्यता धूम्रपान न करणाऱ्यांइतकीच असते.

pexels

धूम्रपान सोडल्यानंतर १५ वर्षांनंतर शरीर पूर्णपणे बरे होते. हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नसते. शरीर अशा टप्प्यावर पोहोचते की त्याने खऱ्या आयुष्यात कधीही धूम्रपान केले नाही.

pexels

२०२७ वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माचं वय किती असेल?