रोज एक कप हिबिस्कस टी पिण्याचे फायदे

pixabay

By Hiral Shriram Gawande
Jul 18, 2024

Hindustan Times
Marathi

हिबिस्कस टी म्हणजे जास्वंदाच्या फुलाच्या चहामध्ये कॅफिन नसते. रक्तदाबाच्या समस्येपासून ते वजनाच्या समस्यांपर्यंत हा चहा फायदेशीर आहे.

pixabay

आयुर्वेद सांगतो की अनेक आजार घरगुती उपायांनी बरे करता येतात. जास्वंदाचे फूल शरीरातील विविध आजार कसे बरे करू शकते हे पाहा. सकाळच्या चहामध्ये हिबिस्कसची फुले मिसळल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

pixabay

जास्वंदाच्या फुलाचा चहा डार्क लाल रंगाचा असतो. या चहामध्ये कॅफिन नसते. त्यामुळे शरीराला विविध फायदे मिळतात.

pixabay

हिबिस्कस टी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

pixabay

विविध अभ्यासानुसार वजन कमी करण्यात या फुलाचे महत्त्व दिसून येते. लठ्ठपणाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी हिबिस्कसचा रस खूप फायदेशीर आहे. 

pixabay

हिबिस्कस टी यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हा चहा शरीरातील विविध विषारी पदार्थ काढून टाकून विविध फायदे देतो.

pixabay

हा चहा बनवण्यासाठी ३-४ जास्वंदाची फुले घ्या. फुले नीट धुवून वाळवा. नंतर भांड्यात पाणी गरम करा आणि पाणी अर्धे झाल्यावर फुले घाला. चहा पिताना त्यात लिंबाचा रस आणि थोडा मध टाकू शकता.

pixabay

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान