नाना पाटेकर यांचा 'वनवास' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या निमित्ताने त्यांच्या गाजलेल्या काही चित्रपटांवर नजर टाकूया..
परिंदा : या चित्रपटात किशन आपला धाकटा भाऊ करणचा उदरनिर्वाह करण्यासाठी गुन्हेगारी जगताकडे वळतो. मात्र, नंतर त्याच्या आयुष्यात वेगळं वळण येतं.
क्रांतिवीर : बालपणी कुटुंब सोडून आलेल्या प्रतापला एक जमीनदार दत्तक घेतो. मात्र, त्या जमीनदाराची हत्या झाल्यावर प्रताप त्याचा बदला घेतो.
वेलकम : नाना पाटेकर यांचा हा चित्रपट अतिशय विनोदी आहे. या चित्रपटात दोन गुंड आपल्या बहिणीचं लग्न लावण्याचा प्रयत्न करत असतात.
खामोशी-द म्युझिकल : मूकबाधिर आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या अॅनीला संगीतकार राज आवडू लागतो. त्यांच्या या प्रेमाच्या वाटेत अनेक अडथळे येतात.
अग्निसाक्षी : या चित्रपटात गर्भश्रीमंत सूरज आपल्या पत्नीसोबत आनंदात जगत असतो, मात्र एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा एक व्यक्ती येतो जो, त्याच्या पत्नीला आपली पत्नी म्हणू लागतो.
शागिर्द : या चित्रपटात पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची कथा दाखवण्यात आली आहे.
टॅक्सी नंबर ९११ : एक टॅक्सी ड्रायव्हर आणि त्याच्या टॅक्सीमध्ये बसलेल्या एका प्रवाशाची धमाल कथा यात पाहायला मिळते.
तिरंगा : या चित्रपटात एका अधिकाऱ्याची हत्या करून पळून जाण्याचा डाव आखणाऱ्या एका दहशतवाद्याला पकडण्याची जबाबदारी निभावणाऱ्या अधिकाऱ्यांची कथा दाखवण्यात आली आहे.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी