'पुष्पा २' हा चित्रपट हिट झाला आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.
अल्लू अर्जुन हा एक दमदार अभिनेता आहे आणि त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
जर, तुम्ही अल्लू अर्जुनचे चाहते असाल आणि तुम्हाला 'पुष्पा २' आवडला असेल, तर तुम्ही त्या त्याचे आणखी काही चित्रपट पाहू शकता.
अल्लू अर्जुनचा 'आर्या' हा एक रोमँटिक ॲक्शन चित्रपट आहे, ज्यामध्ये नायक एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि कथानक पुढे सरकते.
'बनी' हा चित्रपट एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची कथा आहे, जो आपल्या कुटुंबावर अन्याय करणाऱ्यांचा बदला घेतो.
'देसमुदुरू' या चित्रपटात अल्लू अर्जुन एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे, जो एका तरुणीच्या प्रेमात पडतो. या चित्रपटात रोमान्स सोबतच ॲक्शन देखील पाहायला मिळेल.
'पारुगू' हा देखील अल्लू अर्जुनच्या हीट चित्रपटांपैकी एक आहे.
'वेदाम' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हीट ठरला होता. यामध्ये अल्लू अर्जुनने एका गरीब मुलाची भूमिका साकारली आहे, ज्याची खूप मोठी स्वप्न असतात.
अल्लू अर्जुनचा 'जुलाई' हा चित्रपट कॉमेडी आणि ॲक्शनने भरलेला आहे. यामध्ये नायक न केलेल्या बँकेच्या दरोड्यात अडकतो.
अल्लू अर्जुनचा 'रेस गुर्रम' हा चित्रपटही आवर्जून पहावा. यात त्याची जबरदस्त फाईट बघायला मिळाली आहे.