अमजद खानच्या आधी गब्बरची भूमिका डॅनी यांना देण्यात आली होती, हे फार कमी लोकांना माहित आहे.
या चित्रपटात गावाचे नाव रामगड असे दाखवण्यात आले होते. बंगळूरू आणि मैसूर दरम्यान वसलेल्या रामनगर या गावात शोलेची चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटासाठी गावाचा कायापालट करण्यात आला होता.
जया यांचा कंदीलाचा सीन सूर्यास्त आणि रात्रीच्या दरम्यान करण्यात येणार होता. हा सीन चित्रित करण्यासाठी २० दिवस आणि २६ रिटेक गेले.
शोले चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये गब्बर ठाकूरच्या टोकदार शूज मुळे मरत असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, सेन्सर बोर्डने या सीनवर कात्री चालवली होती.
धर्मेंद्र यांना वीरूची भूमिका फारशी आवडली नव्हती. पण, जेव्हा हेमा मालिनी बसंती बनणार आहेत, हे कळले तेव्हा त्यांनीही भूमिका लगेच स्वीकारली.
जयच्या भूमिकेसाठी रमेश सीपी यांनी आधीही शत्रुघन सिन्हा यांची निवड केली होती. मात्र, नंतर ही भूमिका अमिताभ बच्चन यांना देण्यात आली.
गब्बरचा खाकी गणवेश हा मुंबईतील चोर बाजारातून खरेदी करण्यात आला होता. तर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तो एकदाही धुतला गेला नाही.
शोलेच्या शूटिंगच्या काही दिवस आधी संजीव कुमार यांनी हेमा मालिनीला प्रपोज केले होते. त्यामुळे या चित्रपटात दोघांचा एकही सीन सोबत नाही.
चित्रपटाचे लेखक सलीम खान यांचे वडील पोलिसात होते. त्यांनी त्यांना गब्बर डाकूची कहाणी सांगितली होती, जो कुत्रे पाळायचा आणि पोलिसांना मारायचा.
शोले हा चित्रपट बनवण्यासाठी तीन कोटींच्यावर बजेट लागले होते. हा चित्रपट त्यावेळीचा सगळ्यात महागडा चित्रपट होता.