चहा आणि कॉफी न पिण्याचे फायदे ऐकलेत का?

All Photos: Pexel

By Harshada Bhirvandekar
May 24, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्यापैकी अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफी पिऊन होते. 

दिवसाची अशी सुरुवात करणे हे फारच सामान्य असले, तरी हे शरीरासाठी हानिकारक आहे.

फक्त एक महिना चहा-कॉफी अर्थात कॅफीन सोडल्याने शरीरात ५ मोठे सकारात्मक बदल होऊ शकतात.

तुमच्या दिनचर्येतून चहा आणि कॉफी पिण्याची सवय वगळली तर तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतील.

जास्त कॉफी आणि चहा प्यायल्याने दातांवर वाईट परिणाम होतो. यामुळे दातांवर डाग पडतात.

कॉफी, चहा आणि सोडा यांसारखी कॅफिनयुक्त पेये शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी बदलू शकतात.

जर, तुम्ही १ महिन्यासाठी चहा-कॉफी पिणे बंद केले, तर चिंता आणि नैराश्यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत.

Enter text Here

कॅफिनचे सेवन न करणे तुमच्या रक्तदाबासाठी देखील चांगले ठरू शकते. दररोज ३ ते ५ कप कॅफिनमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

कॅफिनच्या अतिसेवनामुळे तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. रात्री कॅफीनचे सेवन करणे टाळावे.

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!