हार्दिक पांड्याच्या बायकोने ‘या’ चित्रपटांमध्ये केलेय काम!

By Harshada Bhirvandekar
Jul 08, 2024

Hindustan Times
Marathi

क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक ही सर्बियन नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. 

नताशाने अनेक हिंदी चित्रपट आणि आयटम साँग्समध्ये काम केले आहे. 

लग्न आणि बाळाच्या जन्मानंतर नताशाने चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवलं. पण याआधी तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

नताशाने प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने अजय देवगणसोबत एक गाणे शूट केले होते. 

नताशाने २०१६मध्ये ‘७ अवर्स टू गो’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात नताशाने पोलिसाची भूमिका केली होती. 

नताशाने २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ढिशक्यांव’ या चित्रपटातही काम केले होते. 

‘ॲक्शन जॅक्शन’ या चित्रपटात अभिनेत्रीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.  

नताशा ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटात मेहबूबा हे गाणे केले होते. या चित्रपटात तिची खास भूमिका होती. 

नताशाने शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात तिची छोटीशी भूमिका होती. 

‘या’ मुलांकाच्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा!