सैफ अली खानचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?
By
Harshada Bhirvandekar
Aug 16, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आज ५४ वर्षांचा झाला आहे. अभिनेता आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
तुमच्या आवडत्या अभिनेत्याचे नाव सैफ अली खान नाही, असे जर कुणी म्हटले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना?
आपल्या चार्मिंग लूकने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणाऱ्या सैफ अली खानने वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
अभिनेता ५४ वर्षांचा झाला आहे. ४ मुलांचा बाप असलेल्या सैफला पाहून तुमचा त्याच्या वयावर विश्वास बसणार नाही.
छोटे नवाब आणि ज्युनिअर पतौडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खानचा जन्म १६ ऑगस्ट १९७० रोजी नवी दिल्लीत झाला.
नवाब पतौडी आणि शर्मिला टागोर यांनी जन्माच्या वेळी त्यांच्या मुलाचे नाव साजिद अली खान ठेवले होते.
चित्रपट विश्वामध्ये येण्यापूर्वी सैफ अली खानला साजिद अली खान या नावाने ओळखले जात होते.
परंतु, अभिनयात करिअर करण्यासाठी त्याने आपले नाव बदलले आणि तो सैफ अली खान बनला.
सध्या कागदावर सैफ अली खानचे नाव साजिदच आहे आणि सैफ हे त्याचे पडद्यावरील नाव आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा