सचिनचे हे ५ विक्रम मोडणं अशक्यच!  

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 24, 2024

Hindustan Times
Marathi

क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की, ‘विक्रम हे मोडण्यासाठीच बनले जातात.’ पण सचिन तेंडुलकरच्या नावावर असे काही विक्रम आहेत, जे क्वचितच कोणी मोडू शकेल. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज ५१ वर्षांचा झाला आहे. सचिनला त्याचे चाहते क्रिकेटचा देव म्हणतात.

ANI

सचिनचे क्रिकेटमधील काही रेकॉर्ड्स मोडणे जवळपास अशक्यच आहे. चला तर मग जाणून घेऊया ते ५ विक्रम, जे मोडणं खूपच कठीण आहे.

१०० आंतरराष्ट्रीय शतक

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके केली. हा विक्रम क्वचितच कोणता फलंदाज मोडू शकेल. 

सचिनच्या नावावर ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके आहेत, तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर २० शतकांनी मागे आहे. 

सचिनने कसोटीत ५१ शतके आणि वनडेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत.

सचिन तेंडुलकरने कसोटीत १५९२१ धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला १४ हजार कसोटी धावाही पूर्ण करता आलेल्या नाहीत.

सर्वाधिक कसोटी धावा

सचिनने १६व्या वर्षी कसोटीत पदार्पण केले आणि वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत खेळत राहिला. त्याने विक्रमी २०० कसोटी सामने खेळले आहेत.

सर्वाधिक कसोटी सामने 

कसोटीप्रमाणेच सर्वाधिक वनडे  सामने खेळण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. ४६३ एकदिवसीय सामने खेळून त्याने निवृत्ती घेतली. 

सर्वाधिक वनडे सामने 

कसोटीप्रमाणेच वनडेतही सचिनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने १८४२६ धावा केल्या. वनडेत द्विशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज होता.

सर्वाधिक एकदिवसीय धावा

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels