Enter text Here
आई-वडिलांनाच वाटत नव्हतं ‘तिचा’ जन्म व्हावा!
By
Harshada Bhirvandekar
Jun 06, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आज (६ जून) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी...
६ जून १९८८ रोजी ऋषिकेश, उत्तराखंड येथे जन्मलेल्या नेहा कक्करच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय वाईट होती.
तिच्याकडे तिच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी देखील पैसे नव्हते. तिचे बालपण अत्यंत गरिबीत गेले.
तिचे वडील घरखर्च भागवण्यासाठी शाळेबाहेर समोसे विकायचे, त्यामुळे शाळेतील मुले तिला चिडवायची.
घरच्या गरजा भागवण्यासाठी नेहा लहानपणापासूनच वडिलांसोबत जगरतामध्ये गायला जात असे.
गरिबीमुळे तिचे आई-वडील तिला जन्म देऊ इच्छित नव्हते. परंतु गर्भधारणेला ८ आठवडे झाल्याने डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला.
नेहा कक्करची गणना आज जगातील सर्वात लोकप्रिय गायकांमध्ये केली जाते.
नेहा कक्कर तिच्या गायनाच्या प्रतिभेमुळे सेलिब्रिटी बनली आहे, पण तिचा प्रवास इतका सोपा नव्हता.
आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना करून ती इथपर्यंत पोहोचली आहे.
सोनाली कुलकर्णीचं फोनबुथ फोटोशूट
पुढील स्टोरी क्लिक करा