'गरबा क्वीन' फाल्गुनी पाठक सध्या काय करते?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 12, 2024

Hindustan Times
Marathi

९०च्या दशकांत आपल्या रोमँटिक गाण्यांनी तरुणाईला भुरळ घालणारी गायिका म्हणजे फाल्गुनी पाठक.

Photo: Instagram

‘गरबा क्वीन’ अशी ओळख बनवणाऱ्या फाल्गुनी पाठक सध्या मात्र रोमँटिक गाण्यांपासून दूर आहेत.

Photo: Instagram

‘याद पिया की आने लगी’, ‘सावन में’, ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्यांनी त्याकाळी खूप धुमाकूळ घातला होता.

Photo: Instagram

फाल्गुनी पाठक यांची गाणी वाजताच तिथे असलेल्या प्रत्येकाचे पाय थिरकल्याशिवाय राहत नाहीत.

Photo: Instagram

आजही यूट्यूबवर त्यांची अशी काही गाणी आहेत, ज्यांना १०० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Photo: Instagram

मात्र, असं काय झालं की, फाल्गुनी पाठक यांनी अचानक रोमँटिक गाणी गाणे बंद केले?

Photo: Instagram

रोमँटिक गाण्यांमुळे फाल्गुनी पाठक यांचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचले होते.

Photo: Instagram

मात्र, एकदिवशी फाल्गुनी यांच्या वडिलांनी लेकीला बोलवून भक्तिगीते गाण्याचा आदेश दिला.

Photo: Instagram

वडिलांच्या बोलण्यामुळेच फाल्गुनी पाठक यांनी केवळ भक्तिगीते गाण्याचा निर्णय घेतला. 

Photo: Instagram

लहान मुलांचे दात किडण्यापासून कसे वाचवावेत?

Pexels