हनुमान जयंती: हे उपाय करा, आर्थिक स्थिती मजबूत होईल

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 28, 2024

Hindustan Times
Marathi

दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमानजींची जयंती साजरी केली जाते. या दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला होता.

यावर्षी हनुमान जयंती (मंगळवारी) २३ एप्रिल २०२४ रोजी येत आहे. जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. 

कारण हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत. या दिवशी हनुमानजींची विशेष आकर्षक सजावट, सुंदरकांड पठण, भजन, व्रत, दान, कीर्तन केले जाते.

पंचांगानुसार, चैत्र पौर्णिमा २३ एप्रिलला पहाटे ३:२५ वाजता सुरू होईल. २४ एप्रिलला पहाटे ५:१८ वाजता समाप्त होईल. २३ एप्रिलला हनुमान जयंती साजरी होईल.

हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला गुलाबाच्या फुलांमध्ये केवडा अर्पण करा. यामुळे ते लवकर प्रसन्न होतात. तसेच, नोकरीत येणारे अडथळे दूर होतील.

जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना लावा. त्यातून आरोग्य मिळते.

व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंगबलीला सिंदूर अर्पण करा.

हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते, यामुळे अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते.

आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूराने स्वस्तिक बनवा आणि हनुमानजींना अर्पण करा. नंतर आपल्या तिजोरीत ठेवा.  

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?