या ट्रेनला चालते- फिरते सेव्हन स्टार हॉटेल बोलले जाते.
गोल्डन चॅरिएट ही एक टुरीस्ट ट्रेन आहे. येत्या १४ डिसेंबरपासून ही ट्रेन सुरू होत आहे.
भारतातील लक्झरी ट्रेनच्या यादीत गोल्डन चॅरिएटचे नाव अव्वल स्थानी आहे.
या ट्रेनमध्ये एक बार देखील आहे, जिथे ब्रॅन्डेड वाइन, बीअर आणि इतर प्रकारची दारू उपलब्ध आहे.
सर्व कॅबिनमध्ये प्रवाशांना, एसी, वाय-फाय, लक्झरी फर्नीचर आणि बाथरूम, आरामदायक बेड, टीव्ही यांसारख्या सुविधा मिळत आहेत.
विशेष म्हणजे, या ट्रेनमध्ये स्पा आणि जीमसारख्या सुविधा देखील मिळत आहेत.
या ट्रेनमध्ये ८० प्रवाशांसाठी ४० कॅबिन आहेत. ज्यात १३ डबल बेड आणि २६ ट्विन बेड असलेल्या कॅबिनचा समावेश आहे. तर, एक कॅबिन दिव्यांगसाठी राखीव आहे.
प्रवाशांच्या सुरक्षतेसठी ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि फायर सेफ्टी अलार्म देण्यात आले आहेत. या ट्रेनचे भाडे (५ दिवस/६ रात्र) ४ लाख ५३० रुपये इतके आहे.