या ५ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतं सोनं
By
Priyanka Chetan Mali
Dec 24, 2024
Hindustan Times
Marathi
सोनं हे खास धातू आहे. ज्याचे दाग-दागिने लोकांना परिधान करायला आवडतात. खास करून महिलांना सोन्याचे दागिने जास्त आवडतात.
ज्योतिषशास्त्रातही सोनं फार महत्वाचं आहे. या धातूचा संबंध गुरु ग्रहाशी आहे.
मान्यतेनुसार, सोन्याच्या वस्तू घातल्याने कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो. मजबूत गुरु ग्रहामुळे जीवनात सर्व क्षेत्रात यश मिळते.
ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशीच्या लोकांना सोनं फार भाग्यशाली ठरतं. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.
मेष - मान्यतेनुसार, सोनं घातल्याने मेष राशीच्या लोकांचा विश्वास वाढतो. सोनं घातल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.
सिंह - सिंह राशीच्या लोकांचाही सोनं परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो. यामुळे सर्व कामात यश मिळते आणि जीवनता प्रगती होते.
कन्या - कन्या राशीचे लोक सोनं परिधान करतात तर त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढते.
तूळ - मान्यतेनुसार तूळ राशीच्या लोकांनी सोनं परिधान केल्यास त्यांना आर्थिक लाभ होतो आणि जीवनात कधीच पैशांची चणचण भासत नाही.
धनु - धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. अशात या राशीच्या लोकांनी सोनं परिधान केल्याने कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होते.
असे सांगितले जाते की, वृषभ, वृश्चिक, मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोनं परिधान करू नये.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
गावरान फोडणीच्या झुणक्याची रेसिपी!
पुढील स्टोरी क्लिक करा