मॅक्सवेलची सर्वात कमी डावात ५ शतकं

AFP

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 11, 2024

Hindustan Times
Marathi

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिका खेळली जात आहे. 

AFP

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सेवलने शतक ठोकले. मॅक्सवेलच्या टी-20 करिअरचे हे पाचवे शतक ठरले.

मॅक्सवेलने ५५ चेंडूत १२० धावांची नाबाद खेळी केली. या डावात मॅक्सवेलने १२ चौकार आणि ८ षटकारांचा पाऊस पाडला. 

मॅक्सवेलचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पाचवे शतक आहे. यासह त्याने रोहित शर्माची बरोबरी केली.

AFP

इतकेच नाही तर मॅक्सवेलने सर्वात जलद म्हणजेच सर्वात कमी डावात ५ टी-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. 

मॅक्सवेलने आपल्या ९४व्या डावात पाचवे टी-20 शतक पूर्ण केले तर रोहितने १४३ डावात ही कामगिरी केली. 

मॅक्सवेलच्या या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकात २४१ धावा ठोकल्या.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान