'घरोघरी मातीच्या चुली'मधील ऋषिकेश-जानकीच्या लग्नाचे खास फोटो

By Aarti Vilas Borade
Jul 23, 2024

Hindustan Times
Marathi

स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरते

आता या मालिकेत जानकी-ऋषिकेशच्या लग्नाची धामधूम सुरु झाली आहे

जानकी-ऋषिकेशच्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाने मिळून पुन्हा एकदा दोघांच्याही लग्नाचा घाट घातलाय

मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता लगबग सुरु आहे ती संगीत सोहळ्याची

जानकी-ऋषिकेशने संगीत सोहळ्यासाठी फिक्का जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे

संगीत सोहळ्यात जानकी-ऋषिकेशच्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे

रणदिवे कुटुंबासोबतच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील नित्या-अधिराज, अंकुश-अबोली, साधी माणसं मालिकेतील सत्या मीरा आणि वैशाली सामंतसोबत छोट्या उस्तादांनी देखिल खास हजेरी लावली आहे

नागा चैतन्य-शोभिता आज अडकणार लग्नबंधनात!