गणपती बाप्पाच्या पूजेत या गोष्टी चुकूनही अर्पण करू नये
By
Priyanka Chetan Mali
Dec 25, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ आणि महत्वाच्या कार्याची सुरवात गणपती बाप्पाच्या पूजनाने होते.
गणेशाला प्रसन्न करण्यासाठी मोदक, शेंदूर आणि दूर्वा नक्की अर्पण करा. यामुळे बाप्पा विघ्न दूर करून तुमच्या इच्छा पूर्ण करेल.
परंतू, गणपती बाप्पाच्या पूजेत काही वस्तू चुकूनही अर्पण करू नये. जाणून घ्या गणेशाच्या पूजनात कोणत्या वस्तू अर्पण करू नये.
गणपती बाप्पाला कधीही तुळस अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार, तुळशीने रागात गणपती बाप्पाला दोन विवाह होईल असा शाप दिला होता.
यानंतर गणपतीनेही तुळशीला शाप दिला की तुझा विवाह राक्षसासोबत होईल. यामुळे गणपती बाप्पाच्या पूजेत तुळशीचा वापर करू नये.
गणपती बाप्पाला अक्षदा वाहताना लक्षात ठेवा की तांदूळाचे तुकडे नसावे. तसेच गणेशाला ओले तांदूळ अर्पण करावे.
विघ्नहर्ता गणेशाला कधीही पांढऱ्या वस्तू अर्पण करू नये. कारण पांढऱ्या वस्तू चंद्राशी संबंधीत आहेत.
भगवान गणेशाचे पिता महादेवाला केतकीचे फूल अर्पण करत नाही. यामुळे गणपती बाप्पालाही केतकीचे फूल अर्पण करत नाही.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
पुढील स्टोरी क्लिक करा