भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री एम्स रुग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते.
मनमोहन सिंग यांना तीन मुली असून त्या काय करतात या विषयी जाऊन घेऊयात. उपींदर सिंग, दमन सिंग अमृत सिंग असे त्यांच्या मुलींची नावे आहेत.
त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव उपींदर सिंग असून त्या इतिहासकार आणि शिक्षिका आहेत. त्या दिल्ली विद्यापीठात इतिहास विषयाच्या प्राध्यापिका राहिल्या आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या मुलीचे नाव दमन सिंग असून त्या लेखिका आहेत. दमन यांनी डॉ. मनमोहन सिंग आणि आई गुरुशरण यांच्या जीवनावर पुस्तक देखील लिहिले आहे.
या पुस्तकाचे नाव 'स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन अँड गुरुशरण' असे असून यात त्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी यात लिहिल्या आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांची तिसरी मुलगी अमृत सिंग या वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या अमेरिकेत काम करतात.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण यांच्या बद्दल बोलायचे झाल्यास त्या इतिहास विषयाच्या प्राध्यापिका होत्या. त्या लेखिका देखील आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुशरण यांच्या सोबत १९५८ मध्ये विवाह केला होता.
मनमोहन सिंग मितभाषी होते. पंतप्रधान भवनात राहतांना ते स्वत:ला एक सामान्य व्यक्ति समजायचे. सरकारी BMW कार पेक्षा, त्यांनी स्वत: खरेदी केलेली मारुती ८०० कार त्यांना अधिक आवडायची.