शांत झोपेसाठी मेलाटोनिनचे उत्पादन वाढवणारे पदार्थ

Pexels

By Hiral Shriram Gawande
Mar 28, 2024

Hindustan Times
Marathi

खराब झोपेमुळे अनेक शारीरिक कार्यांमध्ये व्यत्यय येतो आणि आरोग्यावर परिणाम होतो. येथे ५ पदार्थ आहेत जे मेलाटोनिनचे उत्पादन वाढविण्यात मदत करू शकतात.

Pexels

मेलाटोनिन हा एक आवश्यक हार्मोन आहे जो तुमचा मेंदू अंधाराच्या प्रतिसादात तयार करतो. सूर्यप्रकाश मिळणे, अंधाऱ्या खोलीत झोपणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि मॅग्नेशियम समृध्द अन्न खाणे या सर्व गोष्टींचा स्राव वाढू शकतो.

Pexels

कॅमोमाइल टी: झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाइल टी प्यायल्याने मेलाटोनिन तयार होण्यास मदत होते. त्यात एपिजेनिन असते, जे चिंता कमी करण्यासाठी आणि विश्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी मेंदूतील रिसेप्टर्सशी संवाद साधते.

Pexels

जायफळ: भारतीय स्वयंपाकघरातील एक लोकप्रिय मसाला झोप आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यात मायरीस्टिसिन असते, ज्यामुळे सौम्य सायकोएक्टिव्ह परिणाम होऊ शकतात.

Pexels

वेलची: वेलची हा अप्रतिम मसाला तुम्हाला रात्री चांगली झोप घेण्यास मदत करू शकतो. याला हे आनंददायी सुगंध असतो. याचे पाचक फायदेही आहेत.

Pexels

धणे: मसाल्यामध्ये वापरले जाणाऱ्या धणे दाण्यांमध्ये मॅग्नेशियम असते. हे शांत झोपेसाठी प्रभावीपणे काम करते. 

Pexels

अश्वगंधा: आयुर्वेदानुसार एक शक्तिशाली औषधी वनस्पती, अश्वगंधा अधिक रिलॅक्सिंग स्थितीला प्रोत्साहन देऊन शरीरात तयार होणारे स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी कमी करते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

Pexels

लज्जतदार डाळ कांदा बनवण्याची सोपी रेसिपी!