आयफोन १६ सीरिजवर मिळणार मोठी सूट
Apple
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 11, 2025
Hindustan Times
Marathi
प्रजासत्ताक दिन जवळ आला असून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसह ई-कॉमर्स वेबसाइट्सने त्यांच्या सेलच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
Apple
फ्लिपकार्ट प्रजासत्ताक दिनाचा सेल १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट देण्यात येणार आहे.
Apple
सेलपूर्वी फ्लिपकार्टने आयफोन १६ सीरिजसाठी सवलतीची किंमत जाहीर केली आहे. जर आपण खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑफरच्या किंमती पहा.
Apple
आयफोन १६ ची किंमत ७९ हजार ९९९ रुपये आहे, मात्र, फ्लिपकार्टच्या प्रजासत्ताक दिनाच्या सेलदरम्यान तो ६७ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होईल.
Apple
आयफोन १६ प्लस ७३ हजार ९९९ रुपयांच्या ऑफर प्राइसवर उपलब्ध असेल. आयफोन १६ ची मूल किंमत ८९ हजार ९०० रुपये इतकी आहे.
Apple
आयफोन १६ प्रो फक्त १ लाख ०२ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध असेल.
Apple
आयफोन १६ प्रो मॅक्स ची किंमत १ लाख २७ हजार ९०० रुपये असेल, या मॉडेलची मूळ किंमत १ लाख ४४ हजार ९०० रुपये आहे.
Apple
महत्त्वाचे म्हणजे, या ऑफरमध्ये बँक आणि एक्सचेंज ऑफ रदेखील समाविष्ट असू शकतात. कारण फ्लिपकार्टने सौदे कसे असतील हे स्पष्ट केलेले नाही.
Apple
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी
पुढील स्टोरी क्लिक करा