नवऱ्याबरोबर फिरायला जात नाही का? अमृता खानविलकर म्हणते...

By Harshada Bhirvandekar
May 18, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या अभिनयाने व नृत्याने मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी अमृता खानविलकर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. 

अमृता सध्या तिच्या आई-वडिलांसह लंडनमध्ये गेली असून लंडनमध्ये ती तिच्या आई-वडिलांसह सुट्ट्यांचा मनमुरादपणे आनंद लुटत आहे.

या लंडन ट्रीपचे काही खास फोटो तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोद्वारे अमृताच्या लंडनवारीचे काही खास क्षण पाहायला मिळत आहे. 

अमृता लंडनमध्ये पोहोचल्यापासून लंडनमधील अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत आहे. 

अमृताच्या या पोस्टवर कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला होता. 

अशातच या पोस्टखाली अमृताच्या एका चाहतीने तिला तिच्या नवऱ्याबद्दलचा प्रश्न विचारला आहे. 

तू हिमांशू म्हणजेच नवऱ्याबरोबर कधीच प्रवास का करत नाहीस?, असा प्रश्न एका चाहतीने विचारला आहे.

यावर उत्तर देताना अमृता म्हणाली की, हिमांशू सोशल मीडियावर नाही. त्याला प्रायव्हसी जपायला आवडते.

All Photos: Instagram

माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी