लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहत होती ‘ही’ मराठमोळी जोडी!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
May 06, 2024

Hindustan Times
Marathi

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या रिऍलिटी शोमुळे जुईली जोगळेकर व रोहित राऊत ही जोडी चर्चेत आली. 

सुरुवातीला जुईली व रोहित यांचं असलेलं मैत्रीचं प्रेमात रूपांतरीत झालं आणि दोघांनी लग्नगाठ बांधली.

बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रोहित व जुईली यांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. 

अगदी शाही थाटामाटात रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर ही जोडी विवाहबंधनात अडकली. 

मात्र, लग्नाआधी ही जोडी काही वर्ष एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

यावर बोलताना जुईली म्हणाली की, ‘आम्ही एकत्र तीन वर्षे लिव्ह इनमध्ये राहिलो.’ 

लग्नाचं ठरल्यावर बाबांनी जुईली आणि रोहितला विचारलं की, तुम्ही अजून किती वर्ष घेणार आहात? 

तर, दोघांनीही त्यांना आम्हाला पूर्णपणे सेट व्हायला तीन वर्षे तरी लागतील असं सांगितलं होतं.

आम्ही लिव्ह इनमध्ये राहिलो यात सर्वात मोठा वाटा आमच्या आई-बाबांचा होता, त्यांनी साथ दिली, असे रोहित-जुईली म्हणतात.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!