गरोदर असतानाही ‘या’ अभिनेत्रींनी केलंय चित्रपटात काम!

By Harshada Bhirvandekar
Jul 10, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या डेडिकेशनसाठी ओळखल्या जातात. 

‘शोले’ या चित्रपटादरम्यान जया बच्चन या गरोदर होत्या. या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री जुही चावला देखील प्रेग्नेंट होती. मात्र तिने चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने ‘जुदाई’ चित्रपटात काम केले होते. त्यावेळी ती गरोदर होती. 

‘वी आर फॅमिली’ हा चित्रपट काजोलनं तिच्या गरोदरपणात शूट केला होता. यावेळी काजल दुसऱ्यांदा गरोदर होती.

‘अ थर्सडे’ या चित्रपटात नेहा धुपियाने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नेहा गरोदर होती.

‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करीना कपूर खान गर्भवती होती. 

अभिनेत्री आलिया भट्ट हिने हॉलिवूड चित्रपटाचे चित्रीकरण केले, तेव्हा ती गर्भवती होती. 

‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री यामी गौतम देखील गर्भवती होती. 

दीपिका पदुकोण ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या दरम्यान गर्भवती होती. आता ती लवकरच आई होणार आहे.

वेट लॉस डाएटसाठी हे आहेत लो-कार्ब पदार्थ

Photo Credits: Pexels