ईपीएफओ पेन्शनधारकांना  नववर्षाची खास भेट! 

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 07, 2025

Hindustan Times
Marathi

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक मोठी सुविधा सुरू केली.

या सुविधेंतर्गत आता ६८ लाखांहून अधिक पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांची पेन्शन काढू शकतात. 

कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम जानेवारी २०२५ पासून देशभरात लागू केली जाईल.

नवीन सुरू केलेल्या सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टमचा एक भाग म्हणून लाखो ईपीएस पेन्शनधारकांना या सुविधेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

पेन्शनधारक आता त्यांची बँक किंवा शाखा बदलून किंवा दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाले तरी कोणत्याही बँकेतून त्यांचे पेन्शन काढू शकतील.

पेन्शन सुरू करण्यासाठी पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

निवृत्तीवेतनाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

ईपीएफओने आपल्या सदस्यांना आयुष्यभर पेन्शन देण्यासाठी १९९५ मध्ये ईपीएस सुरू केली होती.

आयफोनपेक्षा सॅमसंगचा 'हा' फोन भारी!

HT Tech