मार्चमध्ये एकादशी कधी-कधी साजरी होणार?

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 02, 2024

Hindustan Times
Marathi

एकादशी हे वर्षातील प्रमुख व्रतांपैकी एक आहे. हा दिवस श्री हरीच्या पूजेला समर्पित आहे. 

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशीचा उपवास हा सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. म्हणूनच या दिवशी भक्त भगवान विष्णूसाठी कठोर व्रत पाळतात. 

हे व्रत सूर्योदयापासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला संपते. एकादशीच्या दिवशी श्री हरीची पूजा करणाऱ्यांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते.

एकादशी ही तिथी महिन्यातून दोनदा येते, तिचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी कधी येणार आहे.

विजया एकादशीचे व्रत ६ मार्चला ०६:३० वाजता सुरू होईल आणि ७ मार्च रोजी पहाटे ०४:१३ वाजता समाप्त होईल. 

विजया एकादशी व्रत सोडण्याची वेळ ७ मार्च रोजी दुपारी ०१:०९ ते ०३:३१ पर्यंत असेल.

अमलकी एकादशी २० मार्च २०२४ रोजी दुपारी १२:२१ वाजता सुरू होईल, तर अमलकी एकादशी २१ मार्च २०२४ रोजी दुपारी ०२:२२ वाजता संपेल. 

अमलकी एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ २१ मार्च २०२४ रोजी दुपारी ०१:०७ ते ०३:३२ दरम्यान असेल.  

विचारांनी मजबूत लोक या गोष्टी करत नाहीत!