रात्रीच्यावेळी आईस्क्रीम खाताय? सावधान! उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Pexels

By Harshada Bhirvandekar
May 27, 2024

Hindustan Times
Marathi

रात्री आईस्क्रीम खाणे काही लोकांना खूप आवडते. रात्रीच्या वेळी आईस्क्रीम खाण्याची सवय आजच्या तरुण पिढीमध्ये वाढताना दिसून येते. पण, ही चांगली सवय नाही.

Pexels

आईस्क्रीममध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाल्ल्याने तुमच्या कॅलरीज वाढतात. यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Pexels

आईस्क्रीममध्ये सहसा साखर आणि फॅट अधिक असते. झोपेच्या काही वेळापूर्वी आईस्क्रीम खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे तुमच्या शरीराची हार्मोन्स नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते. यामुळे निद्रानाश होऊ शकतो.

Pexels

आईस्क्रीममध्ये कॅलरीज जास्त असतात. जास्त प्रमाणात सेवन, विशेषत: रात्रीच्या वेळी सेवन केल्याने चयापचय मंदावते, यामुळे ते वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. 

Pexels

झोपायच्या आधी आईस्क्रीमसारख्या उच्च-कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने पोट फुगणे, गॅस आणि अपचन यांसह पाचक विकार होऊ शकतात. या लक्षणांमुळे रात्रभर झोप येणे कठीण होते.

Pexels

रात्रीच्या वेळी आईस्क्रीम खाल्ल्याने झोपेचा त्रास होऊ शकतो. आईस्क्रीममधील साखरेमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकते.

Pexels

रात्रीच्या वेळी आईस्क्रीम खाल्ल्यावर तुमचे शरीर कसे प्रतिक्रिया देते हे लक्षात घेणे आणि त्यानुसार तुमच्या सवयी बदलणे महत्त्वाचे आहे.

Pexels

जर,तुम्हाला रात्री आईस्क्रीम आवडत असेल तर, संयम महत्वाचा आहे. झोपेवर आणि एकूणच आरोग्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी जास्त खाणे टाळा. आईस्क्रीममध्ये नट्स आणि फळे मिसळा.

Pexels

जर तुम्हाला झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खावे वाटत असेल तर मध, बेरीसह ग्रीक योगर्ट, डार्क चॉकलेट, फ्रुट स्मूदी हे पर्याय ट्राय करा.

Pexels

‘या’ ७ पदार्थांमध्ये आहेत  अंड्यापेक्षा जास्त प्रथिने!

Pexels