निरोगी किडनीसाठी खा 'हे' पदार्थ

Unsplash

By Hiral Shriram Gawande
Mar 23, 2023

Hindustan Times
Marathi

आजकाल खाण्यापिण्यात आणि जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे बहुतेक लोकांना किडनीशी संबंधित समस्या भेडसावत आहेत. 

unsplash

किडनी महत्त्वाचे अवयव असून, ते निरोगी ठेवणे आवश्यक आहे. तुमची किडनी निरोगी ठेवण्यासाठी हे काही पदार्थ उपयुक्त ठरतील. 

unsplash

लसणात सल्फर कंपाऊंड्स, अँटी इंफ्लेमेटरी गुरणधर्म, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी आढळतात. हे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात. 

unsplash

अननस हे कमी पोटॅशियम असलेले फूड किडनीच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. 

unsplash

निरोगी किडनीसाठी मुळा महत्त्वाचा आहे. यात पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते. तर व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.

pixabay

कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, मॅगनीज, प्रीबायोटिक फायबर आणि सल्फर कंपाऊंड असतात. हे निरोगी किडनीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. 

unsplash

अंड्याच्या पांढऱ्या भागात भरपूर प्रथिने असतात. उत्सर्जन प्रणाली निरोगी ठेवण्यासाठई व्हाईट एग खाऊ शकता. 

unsplash

फुलकोबी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि किडनीच्या संसर्गापासून संरक्षण करते. यात व्हिटॅमिन सी, फोलेट आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक घटक असतात.

unsplash

निरोगी किडनीसाठी सफरचंद खाणे फायदेशीर मानले जाते. हे अँटी ऑक्सिडंट्स आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. 

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या.

unsplash