साहित्य-२ चमचे बदाम, ३ चमचे काजू, ३ चमचे पिस्ता, ३ चमचे टरबूजाचे बी, ३ चमचे खसखस, ३ चमचे हिरवी वेलची, २ चमचे दालचिनी, १ चमचा काळी मिरी, १ कप फुल क्रीम दूध, १½ कप साखर, गुलाबाच्या पाकळ्या
एका भांड्यात बदाम, काजू, पिस्ता, टरबूजाच्या बिया, खसखस, हिरवी वेलची, दालचिनी आणि काळी मिरी मिसळा.
या सर्व मिश्रणाची बारीक करून पावडर बनवा. एका कढईत दूध घ्या आणि ते उकळवा.
उकळत्या दुधात साखर घाला.आता दुधात साखर आणि मसाला पावडर मिसळा.
थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेव. नंतर ते एका ग्लासमध्ये ओता.ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा आणि प्या.