घरातच बनवा रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही!
By
Aiman Jahangir Desai
Dec 12, 2024
Hindustan Times
Marathi
हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे जेवण सर्वांनाच आवडते.
परंतु घरी रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही घरी करायला जमत नाही.
आज आपण रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीची रेसिपी पाहणार आहोत...
यासाठी टोमॅटो,आले,हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,लाल तिखट, काजू, खडा मसाला घ्या.
ग्रेव्ही बनवण्यासाठी प्रथम कांदा सोलून बारीक चिरून घ्या. यासोबत टोमॅटोही धुवून कापून घ्या.
एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो,धने आणि काजू घालून मिक्स करा.
नीट मिक्स करून मग गॅस बंद करून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या.
आता पॅनमध्ये पुन्हा तेल गरम करा आणि त्यात २ दालचिनीच्या काड्या, २-३ तमालपत्र, ५-६ हिरव्या वेलची आणि ७-८ लवंगा घाला.
नंतर त्यात सर्व मसाले आणि थोडे पाणी घाला. ग्रेव्ही तयार आहे.
बिग बॉस फेम मॉडेलचा अंगावर शहारे आणणारा बोल्डनेस
पुढील स्टोरी क्लिक करा