लज्जतदार डाळ कांदा बनवण्याची सोपी रेसिपी!

By Harshada Bhirvandekar
Dec 13, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या रोजच्या जेवणामध्ये तुरीची डाळ नक्कीच खाल्ली जाते.

तुरीची डाळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात.

घरच्या घरी डाळ कांदा मसाला कसा बनवायचा याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डाळ कांदा बनवण्यासाठी सुरुवातीला तुरीची डाळ स्वच्छ धुऊन काही वेळ भिजत ठेवा.

यानंतर त्यात पाणी घालून कुकरमध्ये  शिजवून घ्या. शिजवताना त्यात हळद आणि मीठ घाला.

कुकरच्या दोन-तीन शिट्ट्या काढून डाळ चांगली शिजवा. तसेच, वाफ निघून जाईपर्यंत कुकर बंद ठेवा.

नंतर डाळ चांगली रेटून घ्या. आता फोडणी तयार करण्यासाठी कांदा बारीक चिरून घ्या.

सर्वप्रथम कढईत  तूप गरम करून, त्यात कांदा आणि मिरची घालून तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. 

यासोबतच दुसऱ्या फोडणी पात्रात मोहरी, जिरे, लसूण आणि कडीपत्ता घालून फोडणी करा.

ती फोडणी डाळीत घाला. कांदा मऊ झाला की, वरून शिजवलेली डाळ घाला आणि एक उकळी येऊ द्या.

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी