गव्हाच्या पीठाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी!

Pinterest

By Harshada Bhirvandekar
Feb 02, 2025

Hindustan Times
Marathi

घरात पाहुणे आल्यावर किंवा गोड खाण्याची इच्छा असताना कणकेचे लाडू सहज तयार करता येतात.

Pinterest

गव्हाचे लाडू बनवणे खूप सोपे आहे. स्वादिष्ट लाडू बनवण्यासाठी तीन पदार्थ पुरेसे आहेत. नोट करा रेसिपी.

Canva

साहित्य

गव्हाचे पीठ- २ वाट्या, तूप- अर्धी वाटी, गूळ- २ वाट्या.

Canva

कृती

कढई गरम करून त्यात तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात गव्हाचे पीठ घालून भाजून घ्या.

Pinterest

चमच्याने गव्हाचे पीठ सतत ढवळत रहा. किमान १५ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.

Canva

गॅस बंद करून, पीठ थोडे थंड झाल्यावर त्यात गुळाची पूड घालावी.

Canva

गूळ पावडर मिसळलेले पीठ चांगले मिक्स करून घ्या आणि त्याचे लाडू वळून घ्या.

Canva

हवे असल्यास ड्रायफ्रूट्स घालून सजवा. आता गव्हाचे लाडू खाण्यास तयार आहेत.

Canva

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay