घरातील तुळस सुकली? मग ‘हे’ काम नक्की करा!

By Harshada Bhirvandekar
Apr 08, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात असे मानले जाते की, घरात लावलेल्या हिरव्या तुळशीच्या रोपामुळे कुटुंबात सुख समृद्धी येते. 

अशा परिस्थितीत, जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप सुकले असेल, तर त्यामुळे नकारात्मकता निर्माण होऊ शकते.

तुळस सुकल्यानंतर त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू नयेत, म्हणून तुम्ही ‘हे’ काम करू शकता. 

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीचे रोप सुकल्यानंतर त्याचे पावित्र्य संपत नाही. त्यामुळे त्याचे विसर्जन एखाद्या पवित्र नदीत किंवा तलावात करावे.

तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूला दिलेला नैवैद्य अपूर्ण मानला जातो. 

तुम्ही भगवान विष्णूला अर्पण करण्यासाठी वाळलेल्या तुळशीच्या पानांचा वापर करू शकता.  

जर तुमच्या घरात सुकलेल तुळशीचे रोप असेल, तर तुम्ही त्याचे मूळ लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधू शकता.  

यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर राहते. त्यामुळे व्यक्तीला पैशाची चणचण भासत नाही.

सुकलेल्या तुळशीचे विसर्जन एखाद्या पवित्र नदीत किंवा तलावातच करावे.

मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!