शनि जयंतीला चुकूनही करू नका ‘ही’ कामं; अन्यथा व्हाल कंगाल!
By
Harshada Bhirvandekar
Jun 05, 2024
Hindustan Times
Marathi
कॅलेंडरनुसार शनि जयंती दरवर्षी जेष्ठ महिन्यातील अमावस्येला येते. यंदा शनि जयंती ६ जून रोजी आहे.
या दिवशी न्यायाची देवता अर्थात शनि देवाची विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी शनि देवाचा जन्म झाला होता, असे मानले जाते.
या दिवशी काही गोष्टी करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. असे मानले जाते की, या गोष्टी केल्याने शनि देवाचा कोप होतो.
असे मानले जाते की, शनि जयंतीच्या दिवशी चुकूनही तामसिक अन्न खाऊ नये. म्हणजेच मासाहार, दारू किंवा धूम्रपान करू नये.
शनी जयंतीला या वस्तूंचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात लवकरच दारिद्र्य येते आणि तो कंगाल होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
असे मानले जाते की, शनि जयंतीच्या दिवशी कोणालाही दुःखवू नये. त्यामुळे शनिदेव क्रोधित होतात आणि आयुष्यात मोठी संकट येतात.
शनि जयंतीच्या दिवशी मोहरीचे तेल खरेदी करू नये, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अस्थिरता येते.
या दिवशी उडदाच्या डाळीचे सेवन करू नये. तसेच, उडदापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नये, असे केल्याने शनिदेव क्रोधित होतात.
शनी जयंतीच्या दिवशी या ब्रह्मचर्याचे नियम पाळा. अमावस्या तिथीमुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नका.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा