हनुमान जयंतीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामं!

By Harshada Bhirvandekar
Apr 21, 2024

Hindustan Times
Marathi

कॅलेंडरनुसार दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यावर्षी २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. 

या दिवशी काही विशेष नियम लक्षात ठेवून हनुमानाची पूजा करावी तरच व्रत आणि उपासनेचे फळ मिळते.

शास्त्रानुसार हनुमान जयंतीच्या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज्य आहे. चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

शास्त्रानुसार हनुमानजींच्या पूजेमध्ये चरणामृत आणि पंचामृत यांचा वापर केला जात नाही. बजरंगबलीला फक्त गंगाजलाने अभिषेक करावा. 

हनुमान जयंतीच्या दिवशी राहू काळाची विशेष काळजी घ्यावी. हा काळ अशुभ मानला जातो. राहूकाळात बजरंगबलीची पूजा करू नये. 

हनुमान जयंतीच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. बजरंगबलीच्या पूजेमध्ये लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. 

श्रीराम आणि माता अंजनीच्या पूजेशिवाय हनुमानजींची पूजा पूर्ण मानली जाते. म्हणूनच हनुमान जयंतीला त्यांचीही पूजा करा. 

हनुमान जयंतीच्या दिवशी मांस, मासे, अंडी, लसूण, कांदा इत्यादी तामसिक पदार्थांचे सेवन करू नका.

IMDbवर सर्वाधिक पाहिले गेलेले कलाकार