पराठा लाटताना फाटतो? 'या' टिप्स येतील काम!

By Harshada Bhirvandekar
Jan 06, 2025

Hindustan Times
Marathi

बटाटा, कांदा, पनीर असो वा मुळा, प्रत्येकाला स्टफ्ड पराठा खायला आवडतो.

भाजी भरलेले पराठे चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात. पण ते बनवताना नाकीनऊ येतात. 

जर तुम्ही देखील स्टफ्ड पराठा बनवत असाल, तर तो लाटताना फाटू नये यासाठी काही खास टिप्स... 

पीठ चांगले मळून घ्या. त्यात तेल किंवा तूप घातल्याने पराठे मऊ होतात.

पराठ्यात मिश्रण भरताना ते थोडे सुके असावे, आणि ते लाटीच्या मधोमध ठेवावे.

या लाटीच्या कडा व्यवस्थित बंद करून पराठा हळूहळू लाटा म्हणजे मिश्रण एकसारखे पसरते.

पराठा शेकण्यापूर्वी तवा चांगला गरम होऊ द्या. अन्यथा तो तव्याला चिकटून फाटू शकतो.

पराठा मध्यम आचेवर शेकून घ्या आणि तो फुगावा यासाठी हलका दाब द्या.

तयार पराठ्याला तूप किंवा बटर लावा आणि चटणी-लोणच्यासोबत सर्व्ह करा.

Enter text Here