काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...

By Harshada Bhirvandekar
Oct 14, 2024

Hindustan Times
Marathi

अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या सुक्या मेव्यामध्ये काजूचा देखील समावेश आहे. काजू खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.  

काजू खाल्ल्याने वजन वाढते असे अनेकांचे मत आहे. तर, काही लोकांना वाटते की, काजू खाल्ल्याने वजनात काहीच फरक पडत नाही.  

काजू बाबतच्या या प्रश्नावर पोषणतज्ज्ञ म्हणतात की, काजू खाल्ल्याने वजन वाढते आणि कमी देखील होते. 

काजूमध्ये हेल्दी फॅट्स आणि मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन सहज वाढते. 

मात्र काजू खाल्ल्याने शरीरातील सोडियमची कमतरता पूर्ण होते. काजूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. 

काजू खाल्ल्याने पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. यामुळे वजन कमी देखील करता येते.

जर, तुम्हाला वजन कमी करायचंय असेल, तर दिवसभरात दहा ते बारा काजू खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. 

मात्र, यापेक्षा जास्त काजू खाल तर तुमचे वजन नक्कीच वाढेल. यात तळलेले काजू खात असाल तर यामुळे वजन वाढू शकते.  

काही लोक मद्यप्राशन करताना काजू खातात. मात्र, अल्कोहोल सोबत काजू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. यामुळे तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान