सई ताम्हणकरच्या घटस्फोटाने उंचावल्या होत्या साऱ्यांच्या भुवया!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 01, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 

Photo: Instagram

२०१३मध्ये रिलीज झालेल्या 'दुनियादारी' या चित्रपटामुळे सईला वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर सईने मागे वळून पाहिले नाही.

Photo: Instagram

सई तिच्या चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. 

Photo: Instagram

सई सध्या अनीश जोगसोबत रिलेशनशिपमध्ये असली, तरी तिचे आधीच लग्न झाले होते. ती घटस्फोटित आहे. 

Photo: Instagram

अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा विवाह १५ डिसेंबर २०१३ रोजी अमेय गोसावीसोबत झाला होता.

Photo: Instagram

अमेय लोडिंग पिक्चर्स नावाच्या कंपनीचा मालक आहे. सई आणि अमेय यांचा प्रेमविवाह झाला होता. 

Photo: Instagram

३ वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांचे लग्न झाले होते. पण, त्यांचे लग्न काही वर्षेच टिकले आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. 

Photo: Instagram

पण घटस्फोटापूर्वी सईने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितले होते की, तिचा नवरा तिला कामात भरपूर सपोर्ट करतो. 

Photo: Instagram

मात्र, त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सईने तिच्या खांद्यावर लग्नाची तारीख अरबी भाषेत गोंदवून घेतली होती.

Photo: Instagram

श्रिया पिळगांवकर दत्तक मुलगी? सत्य काय? वाचा...

All Photos: Instagram