‘मिर्झापूर ३’च्या ‘सलोनी भाभी’बद्दल या गोष्टी माहितीयत का?
By
Harshada Bhirvandekar
Jul 16, 2024
Hindustan Times
Marathi
‘मिर्झापूर ३’ या वेब सीरिजमध्ये अनेक नवीन पात्रांचा समावेश करण्यात आला असून, त्यातील एक पात्र म्हणजे सलोनी भाभी.
सलोनी म्हणजेच दद्दा त्यागीचा मुलगा भरत त्यागी याची पत्नी. जर, तुम्ही ही वेब सीरिज पाहिली असेल, तर तुम्हाला लक्षात आलंच असेल.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री नेहा सरगम हिने ‘सलोनी भाभी’ची व्यक्तिरेखा खूप छान साकारली असून, तिने लोकांची मने जिंकली आहेत.
नेहाच्या दमदार अभिनयाची, सौंदर्याची आणि साधेपणाची सर्वांनाच भुरळ पडली आहे. खऱ्या आयुष्यात ती खूप स्टायलिश आहे.
‘रामायण’, ‘परमावतार श्रीकृष्ण’ आणि ‘डोली अरमानो की’ सारख्या टीव्ही सिरीयलमध्ये तिने काम केले आहे.
तिने छोट्या पडद्यावर माता सीता आणि यशोदा यांची भूमिका साकारली आहे.
नेहाही मूळची पटनाची रहिवासी असून, ती गायिका बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली होती.
तिने इंडियन आयडॉलमध्ये ऑडिशन देखील दिली होती. मात्र, काही कारणांमुळे तिची निवड होऊ शकली नाही.
तिने इंडियन आयडॉलमध्ये ऑडिशन देखील दिली होती. मात्र, काही कारणांमुळे तिची निवड होऊ शकली नाही.
इंग्रजीतले 'हे' ६ शब्द बनवतील तुम्हाला प्रोफेशनल!
पुढील स्टोरी क्लिक करा