जास्त झोपण्याचे ‘हे’ ५ दुष्परिणाम माहितीयेत का?

By Harshada Bhirvandekar
Jun 16, 2024

Hindustan Times
Marathi

कोणत्याही व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी सात ते आठ तासांची झोप पुरेशी असते.  

जर तुम्ही रोज सात ते आठ तास झोपलात, तर तुमचे आरोग्य चांगले राहते आणि तुम्हाला उत्साही वाटते.

मात्र, काही लोक सात तासापेक्षा कमी झोपतात, तर काही लोक सात तासापेक्षा जास्त झोपतात.  

आज आम्ही तुम्हाला जास्त झोप घेण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगणार आहोत.  

अभ्यासानुसार जास्त झोपल्याने वजन झपाट्याने वाढू शकते आणि तुम्हीही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता.  

जास्त झोपेमुळे मेंदूतील काही न्यूरोट्रान्समीटरवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे डोकेदुखी उद्भवते.  

जास्त वेळ पलंगावर झोपल्याने पाठदुखीचा त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला शरीरात जडत्व येण्याच्या समस्येला ही सामोरे जावे लागू शकते.  

एका अभ्यासानुसार नैराश्याने त्रस्त असलेले १५ टक्के लोक खूप वेळ झोपतात. तुम्हीही जर जास्त झोपत असाल तर आजच काळजी घ्या.  

अभ्यासानुसार, जास्त झोप घेणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay