हिंदूधर्मात जसे भगवान विष्णूचे भक्त एकादशीचे व्रत करतात, त्याचप्रमाणे भगवान शिवाचे भक्त त्रयोदशीला प्रदोष व्रत करतात.
ज्येष्ठ महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत बुधवारी म्हणजेच १९ जून २०२४ रोजी येणार आहे.
बुधवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला बुध प्रदोष असे म्हणतात. बुध प्रदोष व्रत केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते.
आपल्याला मुलांकडून सुख मिळते. मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि बुद्धिमत्तेसाठी हे व्रत पाळले जाते.
बुध प्रदोष व्रत केल्याने करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, असे म्हटले जाते.
पंचांगानुसार, जेष्ठ महिन्याच्या शुक्लपक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजे १९ जून रोजी सकाळी ७ वाजून २८ मिनिटांपासून प्रदोष व्रत सुरू होणार असून, ते २० जून सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांपर्यंत सुरू राहील.
प्रदोष व्रतात संध्याकाळी पूजा केली जाते. बुध प्रदोष व्रताची पूजा वेळ संध्याकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी ते रात्री ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल.
असे मानले जाते की, त्रयोदशी तिथीला भगवान शिव खूप प्रसन्न असतात. आणि मनोभावे पूजा करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण करतात.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान