कोबी ही अनेकांची आवडती भाजी आहे. काही लोक कोबी कच्चाही खातात.या हिवाळ्यात तुम्ही कोबी किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खात असाल, तर एकदा हे वाचा.
pixa bay
कोबी ही वर्षभर खाल्ली जाणारी भाजी आहे. या थंडीत तुम्हीही कोबी खात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.
pixa bay
कोबीमध्ये सल्फोराफेन आणि केम्पफेरॉल सारखे अनेक अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे शरीरातील वेदना आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ही कोबी तुम्ही हिवाळ्यातच नव्हे तर कोणत्याही ऋतूत खाऊ शकता.
pixa bay
या भाजीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. कोबी कर्करोगास प्रतिबंध करतो. कोबीमधील सल्फोराफेन घटक कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात.
pixa bay
कोबीमध्ये व्हिटॅमिन के, आयोडीन आणि अँथोसायनिन्ससारखे अँटिऑक्सिडंट असतात. हे मेंदूच्या पेशी तयार होण्यास मदत करतात. ही भाजी मेंदूची कार्यक्षमता सुधारते. अल्झायमरच्या रुग्णांसाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे.
pixa bay
कोबीमध्ये इतर पोषक तत्वांसह पोटॅशियम देखील असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.