सोनाक्षी सिन्हाचे ‘हे’ गाजलेले चित्रपट माहितीयेत?

By Harshada Bhirvandekar
Jun 22, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता लग्न बंधनात अडकणार आहे. तिने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत.

सोनाक्षी सिन्हा हिने आजवर अनेक चित्रपट केले आहेत. मात्र, आज आपण तिचे गाजलेले ८ चित्रपट जाणून घेऊया...

सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या 'दबंग'मधून डेब्यू केला होता. तिचा पहिलाच चित्रपट हिट ठरला.

अक्षय कुमारसोबत 'राउडी राठौड' या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा झळकली होती. हा चित्रपटही गाजला होता.

सोनाक्षी सिन्हा, अजय देवगण आणि संजय दत्त यांचा 'सन ऑफ सरदार' देखील गाजला होता.

रोमान्स ड्रामा असलेल्या 'लुटेरा' या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होते.

अक्षय कुमारचा 'हॉलिडे' हा सोनाक्षी सिन्हाच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. 

सोनाक्षी सिन्हा हिचा 'अकिरा' हा चित्रपट देखील सगळ्यांना खूप आवडला होता.

सोनाक्षी सिन्हाचा 'इत्तेफाक' हा चित्रपट तिच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता.

अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' चित्रपटात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसली होती.

दुबईच्या राजकुमारीचे आरस्पानी सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

Instagram